सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी राज्यपाल भाजपला आमंत्रित करणार?

सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी राज्यपाल भाजपला आमंत्रित करणार?

मुंबई – शिवसेना-भाजपमधील संघर्षामुळे अजूनही राज्यात सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे राज्यात आता सरकार कोण स्थापन करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे राज्यपाल आज किंवा उद्या विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्याची शक्यता आहे. सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी राज्यपाल हे भाजपला आमंत्रित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करणार का? हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे दुसरे पर्याय खुले असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS