‘या’ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता!

‘या’ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता!

मुंबई – राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळी 11 वाजता राजभवन येथे होणार आहे. या मंत्रिमंडळ वास्तारात शिवसेना- भाजपमधील नव्या नेत्यांना संधी दिली जाणार आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत कोणाला कोणते पद द्यायचे याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

भाजपकडून अमरावतीचे आमदार अनिल बोंडे यांचे नाव विस्तारात निश्चित करण्यात आले आहे, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल सावे यांचेही नाव निश्चित करण्यात आले आहे. तसेच रामदास आठवले यांच्या रिपाइंलाही एक मंत्रिपद देण्यात येणार आहे.

या मंत्र्यांना मिळणार डच्चू ?

दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदल करतांना भाजपमध्ये काही मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्याबरोबर गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरिश आत्राम यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे सर्व मंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा देतील अशी चर्चा आहे.

COMMENTS