राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी खूशखबर, सातवा वेतन आयोगाबाबत मोठी बातमी !

राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी खूशखबर, सातवा वेतन आयोगाबाबत मोठी बातमी !

मुंबई – राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी खूशखबर असून उद्याच्या मंत्रिमंडळात सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांना सुमारे २३ टक्के वेतनवाढ मिळणार असून १७ लाखांपेक्षा जास्त कर्मचा-यांना लाभ होणार आहे. तर सुमारे ७ लाखांपेक्षा जास्त पेन्शन धारकांनाही लाभ मिळणार आहे.

दरम्यान सातवा वेतन आयोगबाबत नेमलेल्या बक्षी समितीचा अहवाल नुकताच राज्य शासनाकडे सादर झाला होता.17 लाखांपेक्षा सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. अंदाजे 21 हजार 530 कोटींच्या आसपास वेतन वाढ द्यावी लागणार आहे. तेवढा भार राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी पडणार असून यामुळे कर्मचा-यांच्या वेतनात जवळपास 23 टक्क्यांची वाढ होणार आहे.

COMMENTS