बोंडअळीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार ?

बोंडअळीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार ?

मुंबई –  बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सरकारची धरसोड वृत्ती दिसून येत आहे. २३ डिसेंबररोजी जाहीर केलेल्या मदतीचा निर्णय सरकारने रद्द केला असून चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दली आहे. तसेच नवा निर्णय घेतल्याने जुना निर्णय रद्द केला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नव्या निर्णयानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याबाबतचा ३ हजार ३७३ कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी राज्य सरकारने बोंडअळीबाबत २२०० कोटी रुपयांचा केंद्र सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावावर केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नसताना दुसरा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे बोंडअळीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचं बोललं जात आहे. ३ महिन्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही, त्यात तो निर्णय रद्द करून नवा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सरकारनं अवलंबलेल्या या धरसोड वृत्तीमुळे सरकार बोंडअळीग्रस्त शेतक-यांना मदत मिळणार की नाही असा सवाल आता शेतकरी करीत आहेत.

COMMENTS