राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार!

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार!

मुंबई – राज्याचा २०१९-२०चा अंतरिम अर्थसंकल्प आज  दुपारी २ वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला जाणार आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राज्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तर यानंतर जून – जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

दरम्यान या अर्थसंकल्पात पुढील 3 महिन्याच्या खर्चाचे नियोजन सादर केले जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी विविध नवीन योजना जाहीर करून भरघोस आर्थिक मदत देण्याची घोषणा केली जाऊ शकते. याशिवाय प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत असलेली दोन हेक्टरची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफी, आपत्कालीन खर्च यासाठी तरतूद अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

COMMENTS