राज्यातील शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक !

राज्यातील शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक !

मुंबई – महावितरणनं राज्यातील घरगुती वीजग्राहक आणि कृषीपंप धारक शेतकर्‍यांना वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. घरगुती वीज दरात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर कृषीपंपाच्या दरात 20 पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रति युनिट दर ३.३५ वरून 3.५५ रुपये एवढ्यावर गेला आहे.

दरम्यान मुंबईतील वीज ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला असून बेस्टच्या वीज दरात ६ ते ८ टक्के कपात करण्यात आली आहे.  तसेच मुंबईतील अदानी, टाटांच्या वीज दरात 1 टक्के वाढ करण्यात आली आहे.

मुंबईतील उद्योगांसाठीचे दर

टाटा पॉवरचा वीज दर 9.12 –  9.38

अदानी 10.07 – 9.37 (कपात आहे)  बेस्ट दर 8.65 8.06

महावितरण दर 8.04 – 8.20

 

कमर्शियल

टाटा 9.71 – 9.90

अदानी 10.76 – 10.05 (कपात)

बेस्ट 9.17 – 8.56

महावितरण 13.47 – 13.80

COMMENTS