भाजपचा 140 जागांचा प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार ?

भाजपचा 140 जागांचा प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार ?

मुंबई – आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपचे आता शिवसेनेसोबतच राहण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी भाजपकडून शिवसेनेला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी १४० जागा देऊ असा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेसमोर ठेवला आहे. तसेच आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढलो तर दोघांचही नुकासान होणार असल्याचं भाजपनं शिवसेनेला म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचा हा प्रस्ताव शिवसेना स्वीकारू शकते अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. परंतु खरच हा प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार का हे मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

दरम्यान मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपनं सत्ता स्थापन केली. परंतु सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेकवेळा शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद झाले असल्याचं अनेक वेळा पहावयास मिळालं आहे. या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यामुळे या दोन्ही पक्षांचं सरकार पाच वर्ष टीकणार की नाही अशीच काहीशी भीती राज्यात होती. परंतु रडतपडत का होईना सेना-भाजपची अखेर पाच वर्षांची सत्ता पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

तसेच या सर्व एकमेकांवरील टीकांनंतर शिवसेनेनं अखेर आपली राज्यातील वाढती ताकद पाहता स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली. परंतु शिवसेनेच्या या घोषणेमुळे राज्यात आपलं नुकसान होऊ शकतं त्यामुळे भाजपकडून सध्या शिवसेनेची मनधरणी सुरु आहे. त्यासाठी 288 पैकी 140 जागांचा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेसमोर ठेवला आहे. परंतु हा प्रस्ताव शिवसेना मान्य करणार का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS