साता-यात मोर्चेक-यांनी आमदार शिवेंद्रराजेंचं भाषण बंद पाडलं !

साता-यात मोर्चेक-यांनी आमदार शिवेंद्रराजेंचं भाषण बंद पाडलं !

सातारा – आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला असून साता-यातही आज बंद पाळण्यात आला आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून लाखो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले देखील सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान शिवेंद्रसिंह राजे यांनी भाषण करण्याचा प्रयत्न केला परंतु भाषणादरम्यान मोर्चक-यांनी त्यांना रोखलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. भाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत या मोर्चेक-यांनी शिवसेंद्रसिंह राजे यांना रोखलं आहे.

दरम्यान आंदोलनात सहभागी झालेले शिवेंद्रराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांना परतावं लागलं आहे. आज राजावाडा परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चात शिवेंद्रराजे आणि शशिकंत शिंदे यांनी सहभाग घेतला. यावेळी मोर्चात सहभागी व्हा पंरंतु भाषण नाही अशी भूमिका या मोर्चक-यांनी घेतली आहे. त्यामुळे भाषणाचा प्रयत्न करत असलेल्या शिवेंद्रराजे यांना जोरदार घोषणाबाजी देत मोर्चक-यांनी त्यांचं भाषण थांबवलं. त्यामुळे परिसरात वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS