लोकांना जसे पाण्यात संताजी- धनाजी दिसायचे, तसेच पवारांना उठसूठ कमळ दिसतय – सुभाष देशमुख

लोकांना जसे पाण्यात संताजी- धनाजी दिसायचे, तसेच पवारांना उठसूठ कमळ दिसतय – सुभाष देशमुख

ठाणे – यापूर्वी लोकांना जसे पाण्यात संताजी- धनाजी दिसायचे, तसेच शरद पवारांना उठसूठ कमळ दिसू लागले आहे, असा टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लगावला. पवारांना खात्री आहे आपला पराभव होणार आहे. त्या पराभवाच्या आधीची पार्श्वभूमी पवार तयार करीत आहेत, असं सुभाष देशमुख म्हणाले आहेत.

दरम्यान घड्याळासमोरचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत जात असल्याचं मी स्वत: पाहिल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यावर सुभाष देशमुखांनी त्यांना टोमणा लगावला. पवारांनी जिथे मतदान केलं, तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, तिथे शिवसेनेचा उमेदवार होता, मग कमळाला मत कसं गेलं, असा प्रश्न सुभाष देशमुख यांनी केला आहे. परंतु पवार यांनी ईव्हीएमबाबतचं वक्तव्य हे गुजरात, हैदराबादचा संदर्भ देऊन केलं होतं. त्यामुळे सुभाष देशमुख यांनी पवारांचं वक्तव्य नीट ऐकलं नसून त्यावर प्रतिक्रिया दिली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS