बड्या अधिका-याच्या लेटरबॉम्बमुळे मंत्री रणजित पाटील अडचणीत !

बड्या अधिका-याच्या लेटरबॉम्बमुळे मंत्री रणजित पाटील अडचणीत !

अकोला – जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार असल्याचं दिसत आहे. कारण जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल केला असून गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील निमबाह्य निविदा मंजूर करण्यासाठी आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी राजीनामापत्रात केला आहे. त्यामुळे रणजित पाटील यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे राजीनामापत्र पाठविलं आहे. बांधकाम विभागाच्या नियमबाह्य निविदा मंजूर करण्यास नकार दिल्याने रणजित पाटील यांनी अपमानास्पद वागणूक दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पालकमंत्री मंत्रीपदाचा धाक दाखवत कारवाईच्या धमक्या देत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या या ‘लेटरबॉम्ब’मूळे डॉ. रणजित पाटील अडचणीत सापडले आहेत.

COMMENTS