उद्या मी आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांकडे जाणार – सुधीर मुनगंटीवार

उद्या मी आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांकडे जाणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई – भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेना, भाजप, आरपीआय आणि मित्रपक्ष यांना जनादेश मिळाला आहे. जनादेशचा सन्मान व्हावा अशी भूमिका भाजपची आहे. आम्ही निर्णय घेतला की महायुतीचे सरकार येण्यासाठीच भाजपचे पाऊल असेल. उद्या मी आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपाल यांच्याकडे जाणार असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

तसेच या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन शेतकरी समस्येवर ओल्या दुष्काळबाबत काम करावे असं ठरलं असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. तसेच या बैठकीत भाजप नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली, 31 डिसेंबरच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण होईल, तसंच 91 हजार बूथ अध्यक्षांची आणि भाजप जिल्हा अध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचंही गडकरींनी म्हटलं आहे.

COMMENTS