ऊस शेती काय टाटा-बिर्लांची नाही – शरद पवार

ऊस शेती काय टाटा-बिर्लांची नाही – शरद पवार

सांगली – ऊसतोड बंद पाडणाऱ्यांनो, ऊस हा टाटा-बिर्लांचा नाही. तो शेतकऱ्यांचा आहे, असे खडे बोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी संघटनांना सुनावले. देशात आज मंदीचे वातावरण असून शेतीच्या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवल्याशिवाय पर्याय नसल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी कुंडलमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व क्रांती समूहाचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कुंडलमध्ये अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लाड यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. या सोहळ्यासाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री जयंतराव पाटील, शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, सध्या आपल्याला अस्वस्थ वाटत आहे. साखर कारखानदारी ही शेतकऱ्यांची आहे. या ठिकाणी सभासद आणि शेतकऱ्यांची बांधिलकी जपली पाहिजे, असे स्पष्ट करत आज ऊस तोड बंद पाडली जात आहे. परंतु ऊस हा काय टाटा-बिर्लांचा नाही, तो शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी दुधात मिठाचा खडा टाकू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी संघटनांना दिला.

COMMENTS