विखे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, चुलते म्हणतात “सुजय विखेंना पाडणे माझे लक्ष्य !”

विखे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, चुलते म्हणतात “सुजय विखेंना पाडणे माझे लक्ष्य !”

अहमदनगर – लोकसभा निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुजय विखे यांना भाजपनं याठिकाणी उमेदवारीही जाहीर केली. परंतु आता सुजय विखेंच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे. कारण भाजपचे उमेदवार व पुतण्या डॉ. सुजय विखे पाटील यांना पाडणे हेच माझे लक्ष्य असून, निवडणूक होईपर्यंत मी नगरमध्ये तळ ठोकणार असे वक्तव्य राधाकृष्ण विखे यांचे थोरले बंधू अशोक विखे यांनी केले आहे. त्यामुळे विखे कुटिंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान माझे वडिल बाळासाहेब यांनी माझ्यासमोर राधाकृष्ण यांना मृत्यूपूर्वी सांगितले होते की जातीयवादी लोकांसोबत कधीही जाऊ नकोस. आपण त्यांच्याशी आयुष्यभर लढलो आहे. त्यांच्यासोबत गेला तर लोकांसमोर कसे जायचे? मात्र आता सुजय विखे भाजपात गेले आहेत. बंधू राधाकृष्ण व वहिनी शालिनीताई या लवकरच भाजपात जाणार आहेत. त्यामुळे मी नगरमध्ये सुजयच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS