वडील काँग्रेस नेते असले तरी मला पक्ष निवडीचा अधिकार, सुजय विखेंचे पक्ष सोडण्याचे संकेत !

वडील काँग्रेस नेते असले तरी मला पक्ष निवडीचा अधिकार, सुजय विखेंचे पक्ष सोडण्याचे संकेत !

अहमदनगर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन त्यांनी हे संकेत दिले आहेत. वडील जरी काँग्रेस नेते असले तरी मला पक्ष निवडीचा अधिकार असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सुजय विखे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे सबंध असल्याने विखे भाजपात जातील ही चर्चा नेहमी सुरु असते त्यात विखेंचे पुत्र डॉक्टर सुजय यांना नगर लोकसभेची जागा लढवायची आहे. परंतु या उमेदवारीबाबत अजून काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाने तिकीट देवो अथवा नाही देवो मी निवडणूक लढविणारच असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

तसेच माझे वडील जरी काँग्रेसचे नेते असले तरी मला माझा पक्ष निवडीचा अधिकार आहे. मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी त्या नेतडत्वाकडे जाईल. त्यास माझ्या कुटुंबाचा विरोध असला तरीही मी माझा निर्णय घेईल वडील काँग्रेसमध्ये म्हणून मी काँग्रेसमध्ये राहीलंच पाहीजे असं नाही, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राधाकृष्ण विखेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेनंतर आता सुजय विखेंच्याही भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

COMMENTS