रायगड – माणगाव नगरपंचायतीत सुनील तटकरेंना धक्का !

रायगड – माणगाव नगरपंचायतीत सुनील तटकरेंना धक्का !

रायगड – माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना जोरदार धक्का बसला आहे.  नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत हा धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या नाराज सदस्यांनी शिवसेनेला साथ दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या योगिता चव्हाण नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्या शुभांगी जाधव यांची वर्णी लागली आहे. सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने हा तटकरेंचा माठा पराभव मानला जात आहे.

दरम्यान या नगरपंचायतीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणाऱे एकूण १७ सदस्य होते. यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, शिवसेनेचे ५ तर काँग्रेसचे १ नगरसेवक होते. यांपैकी राष्ट्रवादीच्या ३ नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा दिला. त्याचबरोबर काँग्रेसच्या एका नगरसेवकानेही शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ५ वरुन थेट ९ झाले. तर राष्ट्रवादीचे संख्याबळ ११ वरुन ८ झाले. त्यामुळे या नगरपंचायतीत शिवसेनेचा विजय झाला असून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS