त्यासाठी मी चंद्रकांत पाटलांना भेटलो – सुनील तटकरे

त्यासाठी मी चंद्रकांत पाटलांना भेटलो – सुनील तटकरे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले होते. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. याबाबत आता तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल मी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत.मी काल केवळ चंद्रकांत पाटील यांना भेटलो नाही तर चार मंत्र्यांना भेटलो, त्यात शिवसेनेचे मंत्रीही होते, तसंच चार सचिवांनाही भेटलो होतो. रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली येथील कुणबी समाज संघाला जागा मिळवण्यासाठी तसेच गुहागर, दापोली, खेड, मंडणगड येथील हायब्रीड अॅन्यूटीमधील रस्त्यांबाबतही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटलो असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच काल मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे राज्यमंत्री दादाजी भुसे, तसेच काही सचिवांनाही भेटलो. लोकसभा निवडणुकीत मी जी कामं करण्याचे आश्वासन दिलं होतं त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी मी या सगळ्यांना भेटलो. माझे विचार, माझी निष्ठा शरद पवारांसोबत आहे. अशा पद्धतीच्या अफवा पसरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेईल असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS