शिवसेनेत जाणार का?, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया !

शिवसेनेत जाणार का?, खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया !

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपात प्रवेश केला. अजूनही काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशातच अजित पवार यांचे विश्वासू असलेले राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परंतु याबाबत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेत जाण्याच्या वृत्तावर संताप व्यक्त केला आहे. मी पवार साहेबांचा निष्ठावान सैनिक आहे. कोणी कुठेही जाऊ द्या, सुनिल तटकरे कुठेही जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल आम्ही पवार साहेबांसोबत मुख्यमंत्र्यांकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलो होतो. काल अख्या दिवसभरात एमआयडीसी सीईओ, प्रधान सचिव यांच्यासोबत बैठका झाल्या. परवा मी दिवसभर श्रीवर्धनमध्ये होतो. त्यामुळे या अफवा आता थांबवणं गरजेचं आहे. मी मजबुतीने, विचाराने आणि सिद्धांताने पवारसाहेबांसोबत राष्ट्रवादीत असून अफवा पसरवणाऱ्या बिकाऊ पत्रकारांवर कायदेशीर कारवाई करता येईल का याची चाचपणी करणार असल्याची संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

COMMENTS