सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केंद्र सरकारला जाग, लोकपाल नियुक्तीबाबत घेणार बैठक !

सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केंद्र सरकारला जाग, लोकपाल नियुक्तीबाबत घेणार बैठक !

नवी दिल्ली – लोकपाल नियुक्तीवरुन सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर केंद्र सरकारला आता जाग आली आहे. त्यामुळे लोकपालच्या नियुक्तीबाबत 1 मार्चरोजी बैठक घेणार असल्याचं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं न्यायालयात सादर केलं आहे. दरम्यान लोकपाल नियुक्ती का केली नाही ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केला होता. तसेच ५ मार्चपर्यंत लोकपाल नियुक्तीबद्दल काय पाऊल उचलले याची माहिती देण्याचा आदेशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. लोकपालची नियुक्ती होत नसल्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला फटकारलं आहे.

दरम्यान याबाबत  पंतप्रधान मोदी, चीफ जस्टीस ऑफ इंडिया, लोकसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत १ मार्च रोजी बैठक होणार असल्याची माहिती  केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. त्यामुळे लोकपाल संदर्भात येत्या १ मार्चरोजी बैठक होणार असून या बैठकीत केंद्र सरकार लोकपालबाबत नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS