दिल्लीत सुप्रिया सुळे, स्मृती इराणींसह महिला नेत्यांनी खेळली फुगडी ! VIDEO

दिल्लीत सुप्रिया सुळे, स्मृती इराणींसह महिला नेत्यांनी खेळली फुगडी ! VIDEO

नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री हरसिमरत कौर आणि पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्री सुखबिर सिंग यांनी त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात फुगडी खेळली आहे. याबाबतचा व्हिडीओ हरसिमरत कौर यांनी आपल्या ट्विटवरुन एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये खासदार सुप्रिया सुळे, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, खासदार किरण खेर ह्या सर्वजणी एकमेकांचा हात पकडून फुगडी खेळताना दिसत आहे. त्यावेळी सगळ्यात खास आकर्षण ठरल्या त्या म्हणजे सुप्रिया सुळे आणि स्मृती इराणी. या सगळ्या महिलांनी पंजाबी संस्कृतीप्रमाणे फेर धरला आणि फुगडी खेळली. काल यावर्षीचं अंतरिम बजेट सादर केलं गेलं. बजेटनंतर महिला खासदारांनी एकत्र जेवण केलं. तेव्हा जेवणानंतर थोडासा विरंगुळा म्हणून त्यांनी पारंपारिक खेळाचा आनंद घेतला.

COMMENTS