राज्यातील 48 खासदारांपैकी आवडतं कोण?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजप खासदाराचं नाव!

राज्यातील 48 खासदारांपैकी आवडतं कोण?, सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजप खासदाराचं नाव!

जळगाव – जळगावमधील कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘उडान’ योजने अंतर्गत नवउद्योजकांना पाठबळ म्हणून विविध साहित्य आणि यंत्रसामुग्रीचे वितरण खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 48 खासदारांपैकी आवडतं कोण? या प्रश्नाचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि जळगावचा आवाज संसदेत मांडणाऱ्या रक्षा खडसे, आपल्या आवडत्या महिला खासदार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान राज्यातील 48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या महिला खासदार आहेत. धडपड करणारे नेतृत्त्व म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं असंही सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच विद्यार्थिनींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूरक आहेत. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत प्रयत्न करुन विद्यार्थिनींना सहकार्य मिळवून देईन. तसेच मोठ्या फॅशन डिझायनिंग कंपन्या आणि डिझायनरसोबत महाविद्यालयाचा करार करण्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन असंही सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS