राष्ट्रवादीच्या बैठकीत या ठरावावर एकमताने मंजुरी – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या बैठकीत या ठरावावर एकमताने मंजुरी – सुप्रिया सुळे

मुंबई – अजित पवार यांनी बंडखोरी करत आज भाजपला पाठिंबा दिला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कारवाई करत शरद पवार यांनी त्यांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदाचे सर्व अधिकार जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.
दिवसभराच्या या घडामोडीनंतर राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट

आज शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ४.३० वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये निवडून आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ नॅशनल काँग्रेस पार्टीच्या सदस्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. Sharad Pawar व प्रदेशाध्यक्ष आ. श्री. Jayant Patil – जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

आ. Ajit Pawar यांची दि. ३० ऑक्टोबर २०१९ रोजी विधिमंडळ पक्षनेता, महाराष्ट्र विधिमंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पदी ठरावाद्वारे निवड करण्यात आली होती. मात्र भाजपा सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका त्यांनी घेतली ती पक्षाच्या ध्येय-धोरणाशी सुसंगत नाही व पक्षाला मान्य नाही. सबब ही निवड आज रोजीच्या ठरावाद्वारे रद्द करण्यात येत आहे.

विधिमंडळ कामकाज नियम व इतर आनुषंगिक नियम व संविधानाप्रमाणे आज शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०१९ पासून श्री. अजित अनंतराव पवार यांचे व्हीप काढण्याचे व पक्षनेता म्हणून असलेले सर्व अधिकार रद्दबातल करण्यात आले आहेत.

आ. श्री. अजित अनंतराव पवार यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल पक्षाच्या वतीने पुढील निर्णय घेण्याच्या दृष्टीने अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष खा. श्री. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांना देण्यात येत आहेत.

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेता पदाचे सर्व संविधानिक अधिकार आ. श्री. जयंत पाटील अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांना देण्यात येत आहेत. उपस्थित नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ नॅशनल काँग्रेस पार्टी यांनी हे ठराव एकमताने मंजूर करून साक्षांकित केल्या आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1556715717799586&id=313596615444842

COMMENTS