महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा, ज्या पुजा घालायच्यात त्या घरी घाला – खा. सुप्रिया सुळे

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा, ज्या पुजा घालायच्यात त्या घरी घाला – खा. सुप्रिया सुळे

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावणमासानिमित सत्यनारायण पूजा करण्यात आली. या पूजेवरून वाद निर्माण झाला आहे. काही विद्यार्थी संघटनांनी  महाविद्यालयातील या पुजेवर आक्षेप घेतला आहे. या वादाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आयोजकांवर टीका केली आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या समस्यांबाबत आज पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको असं म्हटलं आहे.

 

COMMENTS