लोकसभेतील विजयानंतर सुप्रिया सुळेंची शरद पवारांसाठी भावनिक पोस्ट !

लोकसभेतील विजयानंतर सुप्रिया सुळेंची शरद पवारांसाठी भावनिक पोस्ट !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. या विजयानंतर सुळे यांनी आपल्या वडिलांसाठी म्हणजेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी फेसबुकवर एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी माझ्यासाठी माझे वडीलच आदर्श असल्याचं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पोस्टमध्ये एका सभेत वडीलांसाठी म्हटलेली चारोळी पोस्ट केली आहे. ‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!’ या चारोळीबरोबर त्यांनी स्वत:चे आणि शरद पवारांचे फोटो असणारा एका व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे यांनी अशीच बुलंद कहाणी असणाऱ्या बापाची मी लेक आहे असंही म्हटलं आहे. पुढे या व्हिडिओमध्ये अजित पवार यांचे औंक्षण करतानाचा सुप्रिया सुळेंचा फोटो दिसतो. तर व्हिडिओच्या शेवटी सुप्रिया सुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो दिसतो आहे.

श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!

Posted by Supriya Sule on Thursday, May 23, 2019

दरम्यान सुळे यांनी बारामती लोकसभेचा गड सलग तिसऱ्यांदा राखला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल यांचा दीड लाखांहून अधिक मताधिक्य घेत पराभव केला. सुळे यांना नेहमीप्रमाणे बारामती विधानसभेतून सर्वाधिक मतदान झाले. त्यापाठोपाठ दौंड, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदार संघांतूनही त्यांनी मोठय़ाप्रमाणावर मते मिळविली.

COMMENTS