पवारांच्या ‘त्या’ भावनिक कृतीनंतर सुप्रिया सुळे म्हणतात उगाच कोणी शरद पवार होत नाही …

पवारांच्या ‘त्या’ भावनिक कृतीनंतर सुप्रिया सुळे म्हणतात उगाच कोणी शरद पवार होत नाही …

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भावनिक कृतिनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी उगाच कोणी शरद पवार होत नाही असं म्हटलं आहे. झालं असं की राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंत (दादा) पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शरद पवार आपल्या आमदारांसमवेत विधानभवनात आले होते. त्यावेळी फोटोग्राफर लोकांनी आमदारांसह ग्रुप फोटो काढायची विनंती केली.
शरद पवारांनीही लगेच, फोटो काढण्यासाठी होकार दिला. यावेळी फोटो काढताना अचानक त्यांचे लक्ष कोपऱ्यात उभा असणाऱ्या विधानभवनाच्या सुरक्षारक्षकाकडे गेले. त्यावेळी, खुद्द पवारांनी त्या सुरक्षारक्षकाला बोलवून घेतलं. विशेष म्हणजे पहिल्या रांगेत उभे करुन स्वतःसोबत फोटो काढला. पवारांच्या या भावनिक कृतीने अनेकांचे लक्ष वेधले. तर, त्या सुरक्षारक्षकालाही गहिवरुन आले होते. या फोटोनंतर पवारांच्या या कृतीचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी उगाच कोणी शरद पवार होत नाही असं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट

उगाच कोणी शरद पवार होत नाही…

आज माजी मुख्यमंत्री कै. वसंत दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आदरणीय पवार साहेब आपल्या आमदारांसोबत विधानभवनात आले होते. त्यावेळी फोटोग्राफर लोकांनी ग्रुप फोटो काढायची विनंती केली. पवार साहेबांनी ना केली नाही, फोटो काढताना अचानक साहेबांचे लक्ष तिथे कोपऱ्यात असणाऱ्या विधानभवनाच्या सुरक्षारक्षकाकडे गेले, साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं. आणि पहिल्या रांगेत स्वतःसोबत फोटो काढला. साहेबांचे एवढे बारीक लक्ष आणि आपुलकी पाहून त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात पाणी तरळले नसते तरच नवल.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=698981903843418&id=233784690363144

COMMENTS