वेळीच योग्य ती पावलं उचला अन्यथा काट्याचा नायटा होण्यास वेळ लागणार नाही – सुप्रिया सुळे

वेळीच योग्य ती पावलं उचला अन्यथा काट्याचा नायटा होण्यास वेळ लागणार नाही – सुप्रिया सुळे

पैठण – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. पैठण येथील सभेत बोलत असताना त्यांनी जनतेलाही सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ग्रामीण भागातील वित्तपुरवठ्याची सोपी व सुरक्षित साधनं मोडीत निघाली आहेत. वेळीच योग्य ती पावलं उचला अन्यथा काट्याचा नायटा होण्यास वेळ लागणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी सरकावरही जोरदार टीका केली आहे. सत्ता लाल दिवा घेऊन मिरवण्यासाठी नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी हवी आहे. तर शिवसेनेची परिस्थिती ‘एक हात मे दो लड्डू’, अशी झाली आहे. ते सरकारवर टीकाही करतात आणि सत्तेत ही राहतात. ते सरकारला फक्त धमकी देतात की सत्ता सोडून जाऊ. आता भाजपलाही त्याची सवर झाली असून त्यांनीही काही प्रतिक्रिया देण्यास बंद केलं आहे.

दरम्यान चार वर्षांपूर्वी मोठ्या विश्वासाने जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांना सत्ता दिली पण एकही काम झाले नाही. या सरकारचा एकही निर्णय ठोस नाही. कर्जमाफी दिली पण ती अजूनही लोकांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोपही यावेळी सुळे यांनी केला आहे.

 

COMMENTS