खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना अनोखा सल्ला !

खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना अनोखा सल्ला !

इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनोखा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नाहीत. मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज असून राज्यात अजित पवार यांच्याइतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावली तर त्यांची फी सुद्धा आम्ही घेणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक या गावाच्या दौऱ्यावर असताना सुळेंनी हा सल्ला दिला आहे. जर एखादा विद्यार्थी एकाच वर्गात तीन-तीन वर्ष बसून अभ्यास करत असेल, आणि तरीही तो पास होत नसेल, तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज असून राज्य चांगल्या प्रकारे चालवायचे असेल, तर अजित पवार यांच्या इतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावण्याचा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

 

COMMENTS