भर सभेत सुप्रिया सुळेंनी घेतला उखाणा, पहा व्हिडीओ !

भर सभेत सुप्रिया सुळेंनी घेतला उखाणा, पहा व्हिडीओ !

पुणे – बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भर सभेत विद्यार्थिनीच्या आग्रहास्तव उखाणा घेतला असल्याचं समोर आलं आहे. पवार चॅरिटेबल ट्रस्ट व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड या गावात सुप्रिया सुळे यांच्या हस्ते तीन हजार विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला.

यादरम्यान काही विद्यार्थिनींनी सुळे यांना त्यांच्या पतीचं नाव घेण्याचा आग्रह केला. विद्यार्थिनींनी खूपच आग्रह केल्यामुळे आणि त्यांच्या आनंदासाठी सुप्रिया सुळे यांनी उखाणा घेत त्यांच्या पतीचं नाव घेतलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास, सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास असा उखाणा घेतला. सुप्रिया सुळे यांनी घेतलेला हा उखाणा ऐकूण कार्यक्रमातील मुली आणि महिलांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.

COMMENTS