मुतायच्या स्टेटमेंटची आठवण करुन शिवसेनेने त्याच पाण्याने गुळण्या केल्या, सामनातील टीकेला सुप्रिया सुळेंचे जोरदार उत्तर !

मुतायच्या स्टेटमेंटची आठवण करुन शिवसेनेने त्याच पाण्याने गुळण्या केल्या, सामनातील टीकेला सुप्रिया सुळेंचे जोरदार उत्तर !

शिवसेना आणि अजित पवार यांचा वाद आता चांगलाच पेटलाय. जुन्नमध्ये सभेत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी जालन्यातील सभेत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. गेल्या चार वर्षात बापाचं स्मारक बांधू शकला नाही आणि आता आयोद्धेला जाऊन काय करणार अशा शब्दात अजित पवारांनी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला सामनातून शिवसेनेनं उत्तर दिलं. काल अजित पवार यांनी त्याच्यावर पलटवार केला. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबूक पेजवरुन पुन्हा सामनातील टीकेला उत्तर दिले. सुप्रिया सुळे यांची फेसबूक पोस्ट जशी आहे तशी दिली आहे.

तर सामना नामक टॉयलेटपेपर मधून शिवसेनेने अजित पवारांच्या मुतायच्या स्टेटमेंटची आठवण काढत त्याच पाण्याने गुळण्या केल्या आहेत.उद्धव ठाकरेंच्या नावाखाली संपादकीय लिखाण करणाऱ्या संजय राउताने मोठा सोज्वळतेचा आव आणत आपण काहीतरी मर्दुमकी गाजवत असल्याचा गाजावाजा करत मर्यादेबाहेर जाऊन गरळ ओकली आहे. निवडणुका जवळ आल्या की आठवणीत आलेला राममंदिराचा मुद्दा आणि त्यावर अजित दादाने केलेली संयमित टीका,सोबतच मोठ्या साहेबांसोबतचा राज ठाकरेंचा व्हायरल झालेला विमानातील फोटो यामुळे बहुतेक शिवसेनेच्या बुडाखाली आग लागली आहे.

राज्यात पडलेला दुष्काळ,वाढलेली महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शिक्षणव्यवस्थेचे उडालेले बोजवारे,आरोग्य क्षेत्रात चाललेला अनागोंदी कारभार,जलयुक्त शिवारा योजनेचा उडालेला फज्जा या आणि अश्या अनेक प्रशांवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस ठिकठिकाणी आक्रमक होत सरकारला जाब विचारत आहे.शिवाय पक्षाच्या सर्व शीर्ष नेत्यांच्या ट्विटर हँडल वरून रोजच्यारोज #जवाबदो या हॅशटॅग खाली जनतेच्या गरजेच्या आणि महत्वाच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी आवाज उठवत आहे.यामध्ये कोठेही अस्मितेचे प्रश्न आणि त्यामागच्या काँट्रॅव्हरसीना पक्षाने स्थान दिलेले नाहीये. जनतेच्या समोर असणाऱ्या महत्वाच्या प्रश्नांनाच जागा देत राष्ट्रवादी सध्या सरकारला जाब विचारत हैराण करून सोडत आहे.

अश्या वेळी,राममंदिर सारखा अस्मितेचा मुद्दा काढून शिवसेना मुद्दामहून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करत फक्त आणि फक्त धार्मिक ध्रुवीकरणाच राजकारण करत,येणाऱ्या निवडणुका या जनतेच्या मूलभूत प्रश्नावर न होता त्यांना धार्मिक अनुष्ठाण कसे मिळेल याकडे फोकस करत आहे.कारण गेल्या साडेचार वर्षात सत्ता असून देखील भाजपा आणि सेनेच्या सरकारला महाराष्ट्रात काहीच करून दाखवता आलेले नाहीये. वरून भाजपने ज्यापद्धतीने सेनेची ठासली आहे त्यामुळे तर सेना मेटाकुटीला आलेली आहे. अश्या परिस्थितीत सेनेकडे फक्त आता “अस्मितेचे मुद्दे” राहिले आहेत. जो त्यांचा मूळ राजकारणाचा पाया आहे. आणि म्हणूनच या सेफ ग्राऊंडवर खेळताना त्याला अजित दादांनी विरोध केल्यानंतर सेना आक्रमक झाली आहे. कारण एकच कार्ड तर आहे आमच्याकडे…आणि त्याला पण हा माणूस विरोध करतो, हे बहुतेक सेनेला पेलवेना झालेले आहे. त्यात सत्ता नसल्याने अजित दादा काय वाकड करणार..? हा गैरसमजिय कॉन्फिडन्स सेनेला आलेला आहे.नाहीतर अजित दादापेक्षा जास्त अपमान तर भाजपच्या किरीट सोमय्या सारख्या थिल्लर नेत्याने वेळोवेळी सेनेच्या घरात घुसून केलेला आहे. पण तो सध्या भडव्याच्या सरकारमध्ये असल्याने सेना त्याच्या विरोधात जास्त काही स्टँड घेऊ शकत नाही.बहुदा मोदी शेठची भीती सेनेला वाटत असावी.

बाकी किंमत देत नाही वगैरे म्हणत घरच्याच पेपरात डायरेक्ट संपादकीय छापणारे माणसे किती कन्फ्युजड आहेत हे सांगायला नको. बाळ ठाकरेंच्या शेवटच्या काळात चिकनसूप वगैरे बाहेर आलेले शब्द इथली जनता विसरलेली नाहीये. तुम्हाला इथं स्वतःच घर सांभाळता येत नाहीये तिथं मिथे साहेब नुसतं स्वतःचच घर,पुतण्या न सांभाळता ठाकरे घराण्यातील पुतन्यांना ही व्यवस्थित सांभाळत आहेत, हे मोठं दुखन आणि ठसठसनारी नस आहे आपली उद्धवशेठ. कोणताही प्रचार न करता,संसदीय लोकशाहीला जागत थेट जनतेमधून 3 लाख मतांच्या फरकाने निवडून येणारे,आणि त्याच संसदीय  मार्गाने या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी झेप घेणाऱ्या अजित दादांबद्दल तुम्ही फक्त आणि फक्त घरचा पेपर आहे म्हणून हवी तशी टीका करू शकता.पण, मुंबईमध्ये साधी एक निवडणूक लढवायची तुमची लायकी नाहीये.कारण जनतेमध्ये नेमकं कस जायचं हेच मुळी आपल्याला माहिती नाहीये.अस्मितेच राजकारण वजा केलं तर तुम्हाला घंटा कोणी विचारत नाही….आणि म्हणूनच या एकमेव कार्डला अजित दादांनी हात घातल्यानंतर आपला थयथयाट उडणार हे निश्चित होत. शेवटी पवार साहेबांचा पुतण्या म्हणून अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री तरी झाले.बाळासाहेबांचे लाडके चिरंजीव म्हणून आपण साधे नगरसेवक तरी झालात का उद्धव शेठ..?

COMMENTS