‘त्या’ बोलक्या पोपटामुळेच मला राष्ट्रवादीतून बाहेर पडावं लागलं – सुरेश धस

‘त्या’ बोलक्या पोपटामुळेच मला राष्ट्रवादीतून बाहेर पडावं लागलं – सुरेश धस

बीड – भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे. त्यामुळेच मला पक्षातून बाहेर पडायला लागलं असल्याचं धस यांनी म्हटलं आहे. बीडमधील कडामध्ये भाजपच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पक्षातील नेत्यांवर टीका करताना पशु-पक्ष्यांचा छंद असलेल्या राजाची गोष्ट सांगितली.एका राजाला पशु-पक्ष्यांचा छंद होता. सर्वांना राजाकडून सारखी माया लावली जात होती. पण शेवटी आलेल्या पोपटावर राजाचा खूपच जीव जडला. पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे. राजालाही फक्त त्याचंच खरं वाटायला लागलं आहे. त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावं लागल्याचं धस यांनी म्हटलं आहे. तसेच लोकसभेनंतर हा पोपट नसेल असा विश्वासही सुरेश धस यांनी व्यक्त केला.

COMMENTS