बाप बाप होता है, बेटा बेटा होता है, विजयानंतर सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना टोला !

बाप बाप होता है, बेटा बेटा होता है, विजयानंतर सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना टोला !

उस्मानाबाद – विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेला धोबीपछाड दिल्यानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काग्रेस आणि धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाप बाप होता है, बेटा बेटा होता है असं सांगत राजकारणात आपण दिग्गज आहोत, धनंजय मुंडे काल परवा आलेले राजकारणी आहेत अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा हा विजय असल्याची प्रतिक्रियाही सुरेश धस यांनी दिली. यावेळी सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. शरद पवारांनी रमेश कराड हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळेच उमेदवारी मागे घेतली असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याची आठवण करुन देत. अशोक जगदाळे यांची संपत्ती 74 कोटी रुपये तर आपली केवळ 4 कोटी रुपये असल्याचं सांगत राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला असाही आरोप केला.

राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं घड्याळ चिन्ह बदलून स्मार्ट घडाळ्या किंवा किचन ठेवावं अशी टीकाही केली. मतदारांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी किचन आणि स्मार्ट घड्याळ वाटल्याची चर्चा होती. त्यावरुन धस यांनी हा टोला लगावला आहे. घड्याळ हातात बांधलेल्या अनेकांनी आपल्याला मदत केल्याचं सांगत काँग्रेनं आपल्याला मदत केल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं.

COMMENTS