सुरेश धस धनंजय मुंडेंना म्हणाले, ‘शोले’ तर आमचा आहेच, परंतु तुमचा मात्र ‘रामगड के शोले’ झालाय !

सुरेश धस धनंजय मुंडेंना म्हणाले, ‘शोले’ तर आमचा आहेच, परंतु तुमचा मात्र ‘रामगड के शोले’ झालाय !

मुंबई – भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना विधान परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध करताना धनंजय मुंडे यांनी ‘3 इडीयट्स’, ‘शोले’, ‘रामगड के शोले’, ‘ऑल इज वेल’ या चित्रपटांचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. यावर बोलताना सुरेश धस यांनी ‘शोले’ तर आमचा आहेच, परंतु विरोधी पक्षांचा ‘रामगड के शोले’ झाला असल्याचं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीची अवस्था ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाखी झाली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया भादुरी, ऋतिक रोशन हे मल्टिस्टार होते, परंतु चित्रपट मात्र फ्लॉप झाला होता. राष्ट्रवादीची अवस्था अशीच झाली आहे. नावं खूप मोठी पण चित्रपट फ्लॉप आहे असं धस यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात सध्या बाहुबली चित्रपटाची चलती आहे. नरेंद्र बाहुबली, देवेंद्र बाहुबली या बाहुबलींचे सरकार व्यवस्थित काम करत आहेत. यात किती बल्लालदेव, कालकेय आले तरी बाहुबली हरणार नाही. पुढील अनेक वर्ष बाहुबलींचे आहेत, असेही आमदार सुरेश धस यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटलं आहे.

COMMENTS