ब्रेकिंग न्यूज – उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघातून सुरेश धस विजयी, धनंजय मुंडेना जोरदार धक्का !

ब्रेकिंग न्यूज – उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघातून सुरेश धस विजयी, धनंजय मुंडेना जोरदार धक्का !

उस्मानाबाद – उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अखेर भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अशोक जगदाळे यांचा पराभव केला आहे. सुरेश धस यांनी सुमारे 40 मतांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते जास्त असतानाही सुरेश धस यांनी विजश्री खेचून आणली. 1006 पैकी 1005 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काही मते बाद झाली. बाद मतांवरुन दोन्ही उमेदवारांमध्ये काहीवेळ वाद निर्माण झाला होता.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीकडं मुंडे विरुद्ध मुंडे असंही पाहिलं गेलं. त्यात पंकजा मुंडे यांनी बाजी मारली. धनंजय मुंडे यांना हा जोरदार धक्का समजला जातो. विविध कारणांनी ही निवडणूक गाजली. सुरूवातीला भाजपचे रमेश कराड यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचं तिकीटंही मिळवलं. मात्र अचानक त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की आली होती.

COMMENTS