तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच माझे दिल्लीत ‘दुकान’ चालते  -सुशीलकुमार शिंदे

तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच माझे दिल्लीत ‘दुकान’ चालते -सुशीलकुमार शिंदे

सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी तालुक्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वडाळा येथे पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी यांच्यात हुकूमशहा ठासून भरला असून सत्ताधारी हे राक्षस असून त्यांनी जर लोकसभा निवडणूक जिंकली तर ही देशाची शेवटची निवडणूक असणार सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच माझे दिल्लीत ‘दुकान’ चालत असल्याचं यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

 

COMMENTS