पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यास मी घोड्यावर बसायला तयार – सुशीलकुमार शिंदे

पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यास मी घोड्यावर बसायला तयार – सुशीलकुमार शिंदे

सोलापूर – पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यास मी घोड्यावर बसायला तयार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यात या वर्षी पडलेल्‍या दुष्‍काळाच्या पार्श्वभमीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने रड्डे येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली आहे. कर्जमाफी आणि वीजबिल माफ करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत नसून, केवळ पोकळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करण्यात हे सरकार मग्न असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. देशातील शेतकरी सुखी राहिला तरच देश सुखी राहील, जर हे सरकार शेतकरीच उध्वस्त करीत असेल तर देश कसा सुखी राहील असा सवालही यावेळी शिंदे यांनी केला आहे.

 

COMMENTS