कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी भाजपला पाचारण करणे योग्यच – सुशीलकुमार शिंदे

कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी भाजपला पाचारण करणे योग्यच – सुशीलकुमार शिंदे

शिरूर –  कर्नाटकमध्ये भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाचारण केले यात राज्यपालांची काही चूक वाटत नसून त्यांनी घटनेप्रमाणेच कार्यवाही केली असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. परंतु भाजपा बहुमत सिद्ध करू शकणार नाही. तिथे काँग्रेस व जेडीयूचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वासही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिरुर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. परंतु हेड काऊंटप्रमाणे काँग्रेस व जेडीयूला प्रथम संधी द्यायला हवी होती असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गोवा, मणिपूर व मेघालय या राज्यांत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असताना तिथे भाजपाने इतर पक्षाला हाताशी धरून सत्ता स्थापन केली. तो नियम कर्नाटकामध्ये का लागू झाला नाही? याबाबत बोलत असताना ही राज्ये छोटी आहेत. तिथे भाजपाची चालबाजी लक्षात आली नाही. आता मात्र आम्ही अ‍ॅलर्ट आहोत असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कर्नाटकात २३ सभा घेतल्या. एवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही कधी पाहिला नाही, अशी कोपरखळीही शिंदे यांनी यावेळी मारली आहे. कर्नाटकामधील निकालाचा महाराष्ट्रात होणाऱ्या  निवडणुकीवर काही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मोदींचा चलाखपणा माहीत झाला आहे. महागाई, नोटाबंदी तसेच जीएसटीमुळे जनता त्रस्त झाली असून देशात सामाजिक समतेच्या विरोधात वातावरण असल्याची जोरदार टीकाही शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS