अजूनही मोदीबाबाची हवा, माझ्यासारख्या माणसावरही जादू  केली होती – सुशीलकुमार शिंदे

अजूनही मोदीबाबाची हवा, माझ्यासारख्या माणसावरही जादू  केली होती – सुशीलकुमार शिंदे

सोलापूर – मला माहितीय की अजूनही मोदीबाबाची हवा थोडी थोडी आहे. त्यांनी जादू आमच्यावरही केली होती. माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली होती. मी सुद्धा सुरुवातीची दोन वर्षे म्हणत होतो की ते चांगलं काम करतायत. असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. ते सोलापुरातील
औज येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान शिवसेनेसारख्या पक्षाला आम्ही किमान समान कार्यक्रमात समाविष्ठ करुन महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलर सरकार आणलं. ही  सुरुवात आहे. म्हणून आता जास्त जबाबदारी वाढली आहे. परंतु अजूनही मोदीबाबाची हवा थोडी थोडी आहे. त्यांनी माझ्यासारख्या माणसावरही जादू केली होती. मी सुद्धा सुरुवातीची दोन वर्षे म्हणत होतो की ते चांगलं काम करतायत.पण देशाची आर्थिक स्थिती बिघडायला लागली, तरुणांना नोकरी देण्याबाबत दिशाभूल व्हायला लागली, जाती- जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धर्मा-धर्मात वेडी वाकडी भूमिका घेऊन देश बिघडवण्याचं काम सुरु असल्याचंही शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS