लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सुषमा स्वराज यांचा मोठा निर्णय !

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सुषमा स्वराज यांचा मोठा निर्णय !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत भाजच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्वराज यांनी जाहीर केलं आहे. प्रकृती कारणास्तव मी पुढील लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.आज इंदूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी प्रचारात का दिसत नाही आहेत ? असा सवाल त्यांना करण्यात आला त्यावर त्या बोलत होत्या. आडवाणीजी आजही आमचे आदर्श आहेत. पण वाढतं वय आणि प्रकृती यामुळे त्यांना प्रचारात सहभागी होता येत नाहीये. पण त्यांचं मार्गदर्शन पक्षाला सदैव होत असतं. मीही 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाहीये. माझी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालीय. धुळीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी मला प्रवासास मनाई करण्यात आली आहे. तब्येतीच्या कारणास्तव मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.

COMMENTS