कोकणात भाजप-स्वाभिमानीच्या  कार्यकर्त्यांचा राडा !

कोकणात भाजप-स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा राडा !

सिंधुदुर्ग – कणकवलीमध्ये भाजप आणि नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. भाजपाचे युवा नेते संदेश पारकर आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. पारकर यांच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आल्याने त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यामुळे याठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान कणकवली महाविद्यालयाच्या मैदानात आधी राडा झाला. पारकर यांच्या निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली. यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे आणि संदेश पारकर यांच्या गटापर्यंत हा वाद पोहोचला. दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आले.

 

COMMENTS