थेट कृषिमंत्र्यांनाच अस्मान दाखवले, स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयारांनी विधानसभेत खोलले खाते !

थेट कृषिमंत्र्यांनाच अस्मान दाखवले, स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयारांनी विधानसभेत खोलले खाते !

अमरावती – महाआघाडीतील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी विधानसभा मतदारसंघात कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना ९५ हजार ७२५ मते पडली तर अनिल बोंडे यांना ८५ हजार ९५३ मते पडली. मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर काही दिवसा अगोदर शेदूरजना घाट येथे अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची चारचाकी वाहन पेटविली होती. या घटनेमुळे त्यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते.

दरम्यान मोर्शी मतदारसंघात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे विरुद्ध स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार असा सामना रंगला होता. देवेंद्र भुयार हे अमरावतीत जिल्हा परिषद सदस्य आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. डॉ. अनिल बोंडे यांनी या मतदारसंघातून पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. त्यानंतर ते भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. यावेळी मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

COMMENTS