सांगलीतून स्वाभिमानीचा उमेदवार ठरला, ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब?

सांगलीतून स्वाभिमानीचा उमेदवार ठरला, ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली आहे. त्यामुळे स्वाभिमानीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागलं होतं. याठिकाणी स्वाभिमानीकडून उमेदवार निश्चित झाला असून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते येत्या 2 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

दरम्यान या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे याठिकाणी विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील असा सामना रंगणार आहे. त्याचबरोबर या मतदारसंघातून कोणत्याही स्थितीत निवडणूक लढणार असल्याचा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी देखील केला आहे. त्यामुळे पडळकर यांची भूमिका काय असणार हे पाहणं गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही ही निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्यामुळे सांगली मतदारसंघाची निवडणूक आता चांगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS