‘दिल्ली’आंदोलनात स्वाभिमानीची उडी

‘दिल्ली’आंदोलनात स्वाभिमानीची उडी

कोल्हापूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता देशभर परसली असून मंगळवारी महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनात उडी घेतली आहे. अहमदनगर व कोल्हापूर जिल्हयात संघटनेने रस्तावर उतरून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. दरम्यान, कोल्हापूरात माजी खासदार राजू शेट्टी आणि पोलीसांच्यात वादावादी झाली.
केंद्रात भाजप सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू आहे. हे आदोलन दाबण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याने या आंदोलनाची धग वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारले होते. त्यात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येत असताना आंदोलक आणि पोलीसांच्यात वादावादी झाली.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, “दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला जात आहे. त्यांच्यावर पाण्याच्या फवाऱ्याचा आणि अश्रू गॅसचा वापर करण्यात आला. आता आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हटलं जातंय. दिल्लीतील आंदोलन हे केवळ पंजाब वा हरियाणाचे आंदोलन नसून ते संपूर्ण भारताचे आंदोलन आहे.” येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढला नाही तर त्याचे परिणाम केंद्र सरकारला भोगावं लागतील असा इशारा दिला.

COMMENTS