शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणा

शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणा

मुंबई : पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या भाषणावर भाजपने कडाडून आक्षेप घेतला आहे. हिंदू समाजाबद्दल त्याने अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

’30 जानेवारी 2021 रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसर्याल दिवशी पुन्हा हत्या करतो, अशाप्रकारची ही गंभीर विधाने आहेत’ असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘बाहेरच्या राज्यातून एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो, त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवा’ असंही फडणवीस म्हणाले.

COMMENTS