“कोण म्हणतंय मंत्रालयात शिक्षकांना बंदी आहे ?”

“कोण म्हणतंय मंत्रालयात शिक्षकांना बंदी आहे ?”

मुंबई – मंत्रालयात शिक्षकांना प्रवेश बंदीचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. कोणत्याही शिक्षकाला मंत्रालयात प्रवेश देऊ नयेत, अशा सूचना कोणत्याही यंत्रणेला दिलेल्या नाहीत. अनेक शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनीधींनी त्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजही आपली मंत्रालयात भेट घेतली, त्यामुळे शिक्षकांना मंत्रालयात बंदी असल्याचा आरोप खोटा असल्याचं विनोद तावडे म्हणालेत.

मुंबई शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी मंत्रालयात शिक्षकांना प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी केलेला दावा हा पूर्णपणे खोटा चुकीचा व दिशाभूल करणारा आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्था हा विषय पूर्णपणे पोलिसांशी संबंधित आहे. कोणत्या व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश द्यावेत व देऊ नयेत या संदर्भात शिक्षणमंत्री म्हणून आपण कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश पोलिस यंत्रणेला दिलेले नाहीत. असही तावडे त्यावेळी म्हणालेत.

परंतु काहीजण आपल्या प्रश्नासाठी मंत्रालयात आत्महत्येची धमकी देऊन मंत्रालयीन व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारची सूचना मंत्रालयीन सुरक्षा कार्यालयाकडून मिळाल्यानंतर अशा ठराविक व्यक्तिंना प्रवेश देताना पोलिस यंत्रणा दक्षता घेते, त्याच्याशी शिक्षण खात्याचा संबंध नसल्याचं तावडे म्हणालेत.

COMMENTS