उल्हासनगर – महापौरपद टीम ओमी कलानीकडे, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला !

उल्हासनगर – महापौरपद टीम ओमी कलानीकडे, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला !

उल्हासनगर – महापालिकेचं महापौरपद अखेर टीम ओमी कलानींकडे गेलं असून महापौर मीना आयलानी यांनी अखेर राजीनामा दिला आहे. आयलानी यांचा महापौरपदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात आला असून राजीनामा देण्यास त्या टाळाटाळ करत होत्या. परंतु याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचा आदेश देताच त्यांनी आयुक्तांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी टीम ओमी कलानीला दिलेला शब्द अखेर पाळला आहे.

दरम्यान पप्प कलानी यांचा मुलगा ओम कलानी यांनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करत राष्ट्रादीला सोडचिठ्ठी दिली होती. तसेच मागील महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून त्यांनी आपले उमेदवार निवडून आणले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना महापौरपद देण्याचा शब्द दिला होता. परंतु महापौर मीना आयलानी या महापौरपद सोडण्यास तयार नव्हत्या. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनाम्याचा आदेश देताच त्यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे कलानी कुटुंबाला तब्बल बारा वर्षानंतर उल्हासनगरचं महापौरपद मिळालं आहे.

COMMENTS