दहशतवादी म्हणून बदनाम केलेले भारतीय वंशाचे रवी भल्ला अमेरिकेत महापौरपदी !   

दहशतवादी म्हणून बदनाम केलेले भारतीय वंशाचे रवी भल्ला अमेरिकेत महापौरपदी !   

न्यू यॉर्क- अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे.  होबोकेन शहरात ते पहिलेच शीख महापौर झाले.

काही वर्षांपूर्वी रवी भल्ला यांना ‘दहशतवादी’ असे संबोधण्यात आले होते.  त्यांच्या विरोधकांनी अत्यंत खालच्या थराला जाऊन त्यांच्याविरोधात प्रचार केला. अनेक ठिकाणी रवी भल्ला यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला. त्यांचा दहशतवादाशी काहीही संबंंध नसताना त्यांच्या विरोधात संपुर्ण शहरात ‘Don’t let TERRORISM take over our Town!’ असे पत्रके वाटण्यात आले होते. तरीही ते महापौरपदी निवडून आले. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे.

रवी भल्ला यांचा जन्म न्यू जर्सी मध्ये झाला ते इथेच मोठे झाले. रवी भल्ला गेल्या 17 वर्षांपासून होबोकॅनमध्ये राहत आहेत, इथूनच त्यांनी आता महापौर निवडणूक जिंकली आहे. रवी यांनी दोनदा नगरपरिषदचे अध्यक्ष निवडणूक जिंकली आहे.

COMMENTS