शेतमालाच्या आठवडी बाजाराला मुंबई महापालिकेची परवानगी, उस्मानाबादच्या शेतक-यांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन !

शेतमालाच्या आठवडी बाजाराला मुंबई महापालिकेची परवानगी, उस्मानाबादच्या शेतक-यांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन !

औरंगाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2 दिवस औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  19 आणि 20 एप्रिल रोजी ते बैठक घेणार आहेत. मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघ सोलापूर आणि अहमदनगर येथील प्रत्येकी 2 अशा 12 मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार असून प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख 25 कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. तसेच शेतक-यांना आपला शेतमाल विकण्यासाठी मुंबईत लावण्यात येणाऱ्या आठवडी बाजाराला महापालिकेची मंजुरी देण्याचं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. मंत्रालयासमोर आपला शेतमाल फेकून संताप व्यक्त केलेल्या उस्मानाबादमधील आंदोलक शेतक-यांनी आज उद्धव ठाकरे यांची शिवसेनाभवन येथे भेट घेतली. यावेळी या शेतक-यांनी उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं आहे.

दरम्यान यावेळी महापलिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून दिल्या जात असलेल्या तक्रारीची व्यथा या शेतक-यांनी ठाकरेंपुढे मांडली आहे. या बैठकीला महापौरांसह महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित होते. शेतक-यांच्या शेतमालाच्या आठवडी बाजाराला मंजुरी देण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबर तातडीनं बैठक आयोजित करून निर्णय घ्या, असे आदेशही यावेळी ठाकरे यांनी पक्षाच्या महापालिका नेत्यांना दिले आहेत.

COMMENTS