ठाणे – भाजप नगरसेवकाकडे सापडली खोट्या नंबरप्लेटची गाडी !

ठाणे – भाजप नगरसेवकाकडे सापडली खोट्या नंबरप्लेटची गाडी !

ठाणे – ठाणे महापालिकेच्या भाजप नगरसेवकाकडे खोट्या नंबरप्लेटची गाडी सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांच्याकडे ही गाडी सापडली असून  त्यांच्या गाडीच्या नंबरची खरी गाडी डोंबिवलीत आहे. रजिस्ट्रेशन फी आणि रोड टॅक्स वाचवण्यासाठी गाडीची पासिंगच केली नसून मनाप्रमाणे भलताच नंबर लावून तब्बल पाच वर्ष ही गाडी वापरली असल्याची माहिती आहे.

दरम्यान याबाबत माहिती मिळताच पोलिसांकडून गाडीचा मालक एकनाथ शेळके आणि नगरसेवक विलास कांबळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अद्याप कुणालाही अटक केली नसून कांबळे यांनी शेळके यांच्या नावावर गाडी घेतली असून गाडीच्या कर्जाचे हफ्ते कांबळे स्वतः भरत असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS