अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आवाहन!

अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आवाहन!

ठाणे – मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच ठाणे – पालघर – सौराष्ट्र या उत्तर भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे.गेल्या 3 दिवसातल्या पावसाने जून महिन्यातील मुंबईतील पावसाची सरासरी भरून निघाली आहे. जोरदार पावसामुळ् ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या काळात अधिका-यानी अलर्ट राहण्याचे आदेश त्यांनी सर्व महापालिकेच्या अधिका-यांना दिले आहेत.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ठाणे यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर श्री. जयस्वाल यांनी नागरिकांनी अत्यावश्यक बाब वगळता घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

दरम्यान काल रात्रभर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे लोकप्रतिनिधी, अग्नीशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल(टीडीआरएफ), सर्व अधिकारी आणि प्रभाग स्तरिय आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

COMMENTS