ठाण्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाचं कोरोनामुळे निधन !

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाचं कोरोनामुळे निधन !

मुंबई –  राज्यात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. कालच मीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकर यांचा कोोोनामुळे मृत्यूू झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मुकुंद केणी यांच्या निधनामुळे  कार्यकर्ते, समर्थक आणि कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान मुकुंद केणी हे ठाण्यातील गरजू लोकांना मदत करत होते. याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. 27 मे रोजी ही बाब निदर्शनास आली. तेव्हापासून त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर 9 जून रोजी रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली आणि उपचारादरम्यान पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मुकुंद केणी यांच्या निधनाबद्दल
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.  ‘राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपला एक मजबूत शिलेदार गमावला’ अशी भावना आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS