त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आघाडीची सत्ता, मेघालयात त्रिशंकू अवस्था !

त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आघाडीची सत्ता, मेघालयात त्रिशंकू अवस्था !

मुंबई – ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून त्रिपुरामध्ये भाजप सत्ता स्थापन करणार आहे तर नागालँडमध्ये भाजप मित्रपक्षांच्या मदतीने भाजपा सत्ता स्थापन करावी लागणार आहे. तर मेघालयात मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून याठिकाणी कोण सत्ता स्थापन करणार याची मात्र उत्सुकता लागली आहे. तर त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांना जोरदार धक्का बसला असून त्यांचा गड उद्ध्वस्त झाला आहे. तर या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारत डाव्यांच्या गडात कमळ फुलवलं आहे. गेली २५ वर्षांपासून याठिकाणी डाव्यांचीच सत्ता कायम होती. त्यामुळे 25  वर्षांनंतर भाजपनं बहुमताचा आकडा पार करत डाव्यांना चांगलाच तडाखा दिला आहे. त्रिपुरात सत्ता स्थापन करण्यासाठी 60 जागांपैकी 36 जाग मिळवत भाजपनं बहूमताचा आकडा पार केला आहे.

दरम्यान नागालँडमध्ये भाजपला 12, एनपीएफ  28, एनडीपीपी 17, अपक्ष उमदवारांनी 3 ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीने भाजप नागालँडमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तर मघालयात मात्र त्रिशंकू अवस्था असून भाजप  02, काँग्रेस  21, युडीपी 06, राष्ट्रवादी काँग्रेस 01, एनपीपी 19 आणि इतर 10 ठिकाणी विजयी झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असल्यामुळे मेघालयात सत्ता कोण स्थापन करणार याची उत्सुकला लागली आहे.

COMMENTS